हिंदूंनी नामर्द आणि गांडू बनून जगावं आणि इस्लामी आक्रमकांनी आमच्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट कराव्यात हेच काँग्रेसवाल्याचं धोरण असेल तर या तिघांचं काय चुकलं ? मुसलमानी मतांसाठी येथील राज्यकर्त्यांनी जे कृपाछत्र धर्मांधांवर धरलं आहे, ते दूर झालं तर हिंदूही आपल्या आईच्या दुधाची ताकद दाखवून देईल. देशातील बेगडी निधर्मीवाद्यांना अफझल गुरू प्यारा असेल तर आम्ही आक्रमक हिंदू तरुणांवर प्रेम का करू नये ?, अशी पाठराखण बाळासाहेबांनी ' सामना ' च्या अग्रलेखातून केली आहे.
दरम्यान, या तिघांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेनेतर्फे मदत केली जाईल, वकील दिला जाईल, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हायजॅक केला असताना, आता शिवसेनेनं पुन्हा आक्रमक हिंदुत्वाची कास धरली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं साध्वी प्रज्ञा सिंग, समीर कुलकर्णी आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली आहे. त्यांच्या नार्को टेस्टची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून या त्रयीला पाठिंबा जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पण बाळासाहेबांनी अग्रलेखातून मुस्लिमविरोधी परखड मतं मांडली आहेत.
मालेगाव स्फोटांप्रकरणी ज्या अटका होत आहेत ते सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत. पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवलं जातंय. एटीएसवाल्यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटांमागे खरोखरच हिंदू असतील तर त्यांच्यावर तशी वेळ का आली, याचा विचारही करायला हवा, असं बाळासाहेबांनी नमूद केलंय. आज हिंदू सर्वत्र मार खातोय तो सरकारी कृपेनं. हिंदू जरा कुठे उसळी मारू लागला की त्याला दाबता येईल तेवढं दाबायचं आणि मुस्लिम धर्मांधांना खुश करायचं. त्यांना जणू संदेशच द्यायचा की, ' बघा बघा, हिंदूंना त्यांच्याच देशात आम्ही कसे भरडतोय आणि चिरडतोय. उद्या निवडणुका आल्या म्हणजे विसरू नका. ' साध्वी प्रज्ञा, कुलकर्णी आणि मेजर उपाध्याय यांना अटक करण्यामागे नेमकं हेच कारण आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.
अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. पण हिंदूंचे रक्षण करू आणि बांगलादेशी किंवा धर्मांध पाकप्रेमी मुसलमानांना धडा शिकवू, असं कुणी काँग्रेसवाला बोलल्याचं आठवतंय का ? , असा सवाल बाळासाहेबांनी केलाय. सरकार हिंदूंच्या मागे नसेल तर, होतकरू हिंदूंच्या मागे आपणच उभं राहायला हवं आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असंही त्यांनी जाहीर केलंय
साध्वी प्रज्ञासिंह कोण?
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्या काही दिवसांपासून भारतीयच नव्हे तर विदेशी प्रसार माध्यमांमध्येही चर्चिले जाणारे नाव. . कट्टर हिंदुत्ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्या स्फोटात संशयित आरोपी म्हणून. प्रखर राष्ट्रवादी विचार, शब्दांना असलेली धार आणि परखड वक्तृत्वशैली असलेली ही साध्वी. संन्यास स्वीकारण्यापूर्वी प्रज्ञासिंह भाजपच्या माध्यमातून विधानसभेवर जाण्यास इच्छुक होती. मात्र तिच्यातल्या जहाल हिंदुत्ववादी विचारांनी तिला तुरुंगात आणून पोचविले.
प्रज्ञाने संन्यास स्वीकारल्यानंतर तिचे नाव बदलून साध्वी पूर्णचेतनानंदगिरी झाले. मात्र संन्यास स्वीकारल्यानंतरही तिला या सांसारिक संकटांचा सामना करावाच लागला आणि मालेगावमध्ये गेल्या 29 सप्टेंबरला झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी तिला अटक करण्यात आली.
प्रज्ञाच्या आयुष्याची जितकी पाने उलटली तितक्या नवीन गोष्टी समोर येतात. एका अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा प्रवास म्हणजेच प्रज्ञा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपला प्रज्ञाशी काहीही संबंध नसल्याचे सांगितले, असले तरीही तिचे भाजपसोबत जुने संबंध आहेत. हे अनेकदा सिध्द झाले आहे.
मूळची मध्यप्रदेशातील भिंड जिल्ह्यातल्या लहार या गावात जन्मलेली आणि मोठी झालेली प्रज्ञा लहानपणापासूनच अभ्यासात प्रचंड हुशार आहे. शालेय जीवनात ज्युदो आणि कराटेंमध्ये तरबेज असलेली प्रज्ञा इतर खेळांमध्येही तरबेज आहे. तिने खेळांमध्ये अनेक पदक व करंडक पटकाविले आहेत. महाविद्यालयीन जीवनात मुलींची छेड काढणा-या अनेकांना तिने धूळ चारली आहे.
पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बी.पीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील ठाकूर चंद्रपालसिंह हे देखिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे वैद्य आहेत. लहार या गावाच्या नगर कार्यवाह पदाची जबाबदारीही त्यांनी संघात असताना सांभाळली आहे. चार बहिणी आणि एक भाऊ असलेली प्रज्ञा सर्वांत मोठी होती.
अभाविपची पूर्ण वेळ कार्यकर्तीः घरातूनच संघाच्या विचारांचे संस्कार असल्याने शैक्षणिक जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आली. लहार गाव सोडून ती भोपाळला आली. तेथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करताना ती विद्यार्थी परिषदेची संघटन मंत्री होती. उज्जैनमध्येही तिने काही दिवस अभाविपचे काम केले. 1992 ते 1997 पर्यंत ती विद्यार्थी परिषदेत होती.
विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम करताना त्यातून विकसीत झालेल्या नेतृत्व गुणाचा फायदा प्रज्ञाने करून घेतला. 1997 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सोडल्यानंतर तिने भाजपमध्ये सक्रीय काम सुरू केले. 1998 मध्ये विधानसभा निवडणुकींपूर्वी भिंड जिल्ह्यातील मेहगावमधून उमेदवारी मिळविण्यासाठीही प्रयत्न केले. 1999 मध्ये तिने 'जय वंदे मातरम' या संघटनेचे काम सुरू केले.
जूना आखाड़ाच्या पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद यांचे शिष्यत्व स्वीकारून तिने 2006 मध्ये संन्यास स्वीकारला. त्यानंतर एक जहाल प्रवचनकार म्हणून तिने आपली ओळख निर्माण केली. साध्वी प्रज्ञा यांचे प्रवचन साध्वी ऋतंभरा यांच्या सारखेच जहाल असते.
2 comments:
mujhe aapki bhasha samajh me nahi aayi kintu aapke lekhon ke naam se hi bhaav samajh me aa gaya . me bhi apne baare me bata doon ki sadhvi pragya singh mere sangthan se hi judi hai. main uttar pradesh hindumahasabha va abhinav bharat dono ka hi pradesh pramukh hoon. aasha karta hoon ki kuch lekh hindi mme bhi likhenge.
mujhe aapki bhasha samajh me nahi aayi kintu aapke lekhon ke naam se hi bhaav samajh me aa gaya . me bhi apne baare me bata doon ki sadhvi pragya singh mere sangthan se hi judi hai. main uttar pradesh hindumahasabha va abhinav bharat dono ka hi pradesh pramukh hoon. aasha karta hoon ki kuch lekh hindi mme bhi likhenge.
Post a Comment