गोळीला गोळीनेच उत्तर देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही, जर कोणी असे सांगितले असेल तर ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नांदेड आणि पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. 'गोळीची भाषा करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना एकटे पाडले.
राहुल राज एन्काउण्टरनंतर उपमुख्यमंत्री पाटील यांनी गोळीची भाषा केल्याचे निदर्शनास आणले असता भुजबळ म्हणले की हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल. ही भाषा बरोबर नाही, आमच्या पक्षाची ती भूमिका नाही. त्यावर केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांचा उल्लेख न करता, उपमुख्यमंत्री पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले : त्यांचा बोलविता धनी कोणीही नाही. त्यांना कोणीही धनी नाही. ते स्वत:चे धनी आहेत! याबाबत सर्वांना बरोबर घेऊन जाणारी पक्षाची भूमिका आहे.
परीक्षेला आलेल्या बिहारी मुलांना मारहाण करणे ही राज ठाकरे यांची चूक होती. आमच्या मुलांबाबत बिहारमध्ये असे घडले असते तर आम्हालाही वाईट वाटले असते. पण मराठी मुलांना रेल्वेत नोकऱ्या मिळत नाहीत, या राज यांच्या तक्रारीची दखल घेऊन खरे काय ते शोधून काढणे हे राज्य सरकारचे काम आहे. रेल्वेत काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मराठी लोकच बिहारी लोकांचे संरक्षण करतील. त्यांचे संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.

No comments:
Post a Comment