Friday, October 15, 2010

Friday, November 7, 2008

पुण्याहून पत्र

प्रिय बाबा, शि. सा. न. वि. वि .
मी पुण्यात सुखरूप पोहोचलो. इथे बऱ्याच गंमती पाहायला मिळत आहेत.
पुणेकरांचं जुनं वाहन म्हणजे सायकल. आपल्या गावात जसे देवाला सोडलेल्या रेड्याला काही करत नाहीत, तसंच इथे सायकलस्वारांना कोणतेही नियम लागू नाहीत. इथलं सध्याचं वाहन म्हणजे बाइक. त्यांना इंधनबचतीचं महत्त्व खूपच पटलं आहे. त्यामुळे ते दुचाकीवर तीनजण बसतात. सिग्नलपाशी लाल दिवा असला, तरी सहसा थांबत नाहीत. त्यामुळे पेट्रोल जास्त जळते ना. वळताना हात दाखवायचा, तर चौदा स्नायू वापरावे लागतात म्हणे! म्हणून हात दाखवण्याचे कष्ट कुणी घेत नाही. हात दाखवून अवलक्षण व्हायला नको म्हणून रिक्षावाले तर पायानं वळण्याचा इशारा करतात.

इथे सहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना तीन आसनी रिक्षा म्हणतात आणि दहा प्रवासी बसलेल्या रिक्षांना सहा आसनी रिक्षा म्हणतात. आहे ना गंमत?

अशाच काही गंमती पुढच्या पत्रात.

तुमचा लाडका

बंड्या

Saturday, November 1, 2008

हिंदूंनो, साध्वी प्रज्ञाच्या पाठीशी उभे राहा!

राष्ट्राच्या मुळावर उठणा-या कुठल्याही दहशतवादाला आम्ही कधीच पाठिंबा दिलेला नाही. किंबहुना, अशा दहशतवादाचा निषेधच व्हायला हवं. पण मुस्लिम धर्मांधांना खुश करण्यासाठी होतकरू तरुणांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवण्याचा उफराटेपणा काँग्रेसनं चालवला आहे. अशावेळी साध्वी प्रज्ञा, समीर कुलकर्णी आणि मेजर रमेश उपाध्याय यांच्या पाठीशी हिंदू समाजानं खंबीरपणे उभं राहायला हवं, असं आवाहन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलंय.

हिंदूंनी नामर्द आणि गांडू बनून जगावं आणि इस्लामी आक्रमकांनी आमच्या पिढ्याच्या पिढ्या नष्ट कराव्यात हेच काँग्रेसवाल्याचं धोरण असेल तर या तिघांचं काय चुकलं ? मुसलमानी मतांसाठी येथील राज्यकर्त्यांनी जे कृपाछत्र धर्मांधांवर धरलं आहे, ते दूर झालं तर हिंदूही आपल्या आईच्या दुधाची ताकद दाखवून देईल. देशातील बेगडी निधर्मीवाद्यांना अफझल गुरू प्यारा असेल तर आम्ही आक्रमक हिंदू तरुणांवर प्रेम का करू नये ?, अशी पाठराखण बाळासाहेबांनी ' सामना ' च्या अग्रलेखातून केली आहे.

दरम्यान, या तिघांना कायदेशीर लढाई लढण्यासाठी शिवसेनेतर्फे मदत केली जाईल, वकील दिला जाईल, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठीचा मुद्दा हायजॅक केला असताना, आता शिवसेनेनं पुन्हा आक्रमक हिंदुत्वाची कास धरली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसनं साध्वी प्रज्ञा सिंग, समीर कुलकर्णी आणि निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांना अटक केली आहे. त्यांच्या नार्को टेस्टची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून या त्रयीला पाठिंबा जाहीर केल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. पण बाळासाहेबांनी अग्रलेखातून मुस्लिमविरोधी परखड मतं मांडली आहेत.

मालेगाव स्फोटांप्रकरणी ज्या अटका होत आहेत ते सगळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत लोक आहेत. पण त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांना ' हिंदू दहशतवादी ' ठरवलं जातंय. एटीएसवाल्यांच्या म्हणण्यानुसार, या स्फोटांमागे खरोखरच हिंदू असतील तर त्यांच्यावर तशी वेळ का आली, याचा विचारही करायला हवा, असं बाळासाहेबांनी नमूद केलंय. आज हिंदू सर्वत्र मार खातोय तो सरकारी कृपेनं. हिंदू जरा कुठे उसळी मारू लागला की त्याला दाबता येईल तेवढं दाबायचं आणि मुस्लिम धर्मांधांना खुश करायचं. त्यांना जणू संदेशच द्यायचा की, ' बघा बघा, हिंदूंना त्यांच्याच देशात आम्ही कसे भरडतोय आणि चिरडतोय. उद्या निवडणुका आल्या म्हणजे विसरू नका. ' साध्वी प्रज्ञा, कुलकर्णी आणि मेजर उपाध्याय यांना अटक करण्यामागे नेमकं हेच कारण आहे, असा आरोपही त्यांनी केलाय.

अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सरकार कटिबद्ध आहे, हे वाक्य वारंवार ऐकायला मिळतं. पण हिंदूंचे रक्षण करू आणि बांगलादेशी किंवा धर्मांध पाकप्रेमी मुसलमानांना धडा शिकवू, असं कुणी काँग्रेसवाला बोलल्याचं आठवतंय का ? , असा सवाल बाळासाहेबांनी केलाय. सरकार हिंदूंच्या मागे नसेल तर, होतकरू हिंदूंच्या मागे आपणच उभं राहायला हवं आणि शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहील, असंही त्यांनी जाहीर केलंय

साध्‍वी प्रज्ञासिंह कोण?


साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीयच नव्‍हे तर विदेशी प्रसार माध्‍यमांमध्‍येही चर्चिले जाणारे नाव. . कट्टर हिंदुत्‍ववादी विचारांची प्रज्ञासिंह आज सर्वांच्‍या चर्चेचा विषय ठरलीय ते मालेगावच्‍या स्‍फोटात संशयित आरोपी म्‍हणून. प्रखर राष्‍ट्रवादी विचार, शब्‍दांना असलेली धार आणि परखड वक्‍तृत्‍वशैली असलेली ही साध्‍वी. संन्‍यास स्‍वीकारण्‍यापूर्वी प्रज्ञासिंह भाजपच्‍या माध्‍यमातून विधानसभेवर जाण्‍यास इच्छुक होती. मात्र तिच्‍यातल्‍या जहाल हिंदुत्ववादी विचारांनी तिला तुरुंगात आणून पोचविले.

प्रज्ञाने संन्यास स्‍वीकारल्‍यानंतर तिचे नाव बदलून साध्वी पूर्णचेतनानंदगिरी झाले. मात्र संन्‍यास स्‍वीकारल्‍यानंतरही तिला या सांसारिक संकटांचा सामना करावाच लागला आणि मालेगावमध्‍ये गेल्‍या 29 सप्‍टेंबरला झालेल्‍या बॉम्‍बस्‍फोटप्रकरणी तिला अटक करण्‍यात आली.

प्रज्ञाच्‍या आयुष्‍याची जितकी पाने उलटली तितक्‍या नवीन गोष्‍टी समोर येतात. एका अपूर्ण राहिलेल्‍या स्‍वप्‍नांचा प्रवास म्‍हणजेच प्रज्ञा. भाजपच्‍या वरिष्‍ठ नेत्‍यांनी आपला प्रज्ञाशी काहीही संबंध नसल्‍याचे सांगितले, असले तरीही तिचे भाजपसोबत जुने संबंध आहेत. हे अनेकदा सिध्‍द झाले आहे.

मूळची मध्‍यप्रदेशातील भिंड जिल्‍ह्यातल्‍या लहार या गावात जन्‍मलेली आणि मोठी झालेली प्रज्ञा लहानपणापासूनच अभ्‍यासात प्रचंड हुशार आहे. शालेय जीवनात ज्‍युदो आणि कराटेंमध्‍ये तरबेज असलेली प्रज्ञा इतर खेळांमध्‍येही तरबेज आहे. तिने खेळांमध्‍ये अनेक पदक व करंडक पटकाविले आहेत. महाविद्यालयीन जीवनात मुलींची छेड काढणा-या अनेकांना तिने धूळ चारली आहे.

पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्‍यानंतर तिने बी.पीएड. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. तिचे वडील ठाकूर चंद्रपालसिंह हे देखिल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करणारे वैद्य आहेत. लहार या गावाच्‍या नगर कार्यवाह पदाची जबाबदारीही त्‍यांनी संघात असताना सांभाळली आहे. चार बहिणी आणि एक भाऊ असलेली प्रज्ञा सर्वांत मोठी होती.

अभाविपची पूर्ण वेळ कार्यकर्तीः घरातूनच संघाच्‍या विचारांचे संस्‍कार असल्‍याने शैक्षणिक जीवनात ती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या संपर्कात आली. लहार गाव सोडून ती भोपाळला आली. तेथे पूर्णवेळ कार्यकर्ती म्‍हणून काम करताना ती विद्यार्थी परिषदेची संघटन मंत्री होती. उज्जैनमध्‍येही तिने काही दिवस अभाविपचे काम केले. 1992 ते 1997 पर्यंत ती विद्यार्थी परिषदेत होती.

विद्यार्थी संघटनेच्‍या माध्‍यमातून काम करताना त्‍यातून विकसीत झालेल्‍या नेतृत्‍व गुणाचा फायदा प्रज्ञाने करून घेतला. 1997 मध्‍ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम सोडल्‍यानंतर तिने भाजपमध्‍ये सक्रीय काम सुरू केले. 1998 मध्‍ये विधानसभा निवडणुकींपूर्वी भिंड जिल्‍ह्यातील मेहगावमधून उमेदवारी मिळविण्‍यासाठीही प्रयत्‍न केले. 1999 मध्‍ये तिने 'जय वंदे मातरम' या संघटनेचे काम सुरू केले.

जूना आखाड़ाच्‍या पीठाधीश्वर स्वामी अवधेशानंद यांचे शिष्‍यत्व स्‍वीकारून तिने 2006 मध्‍ये संन्यास स्‍वीकारला. त्‍यानंतर एक जहाल प्रवचनकार म्‍हणून तिने आपली ओळख निर्माण केली. साध्‍वी प्रज्ञा यांचे प्रवचन साध्वी ऋतंभरा यांच्‍या सारखेच जहाल असते.

गोळीला गोळीनेच उत्तर देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नाहि -छगन भुजबळ


गोळीला गोळीनेच उत्तर देण्याचे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे नाही, जर कोणी असे सांगितले असेल तर ते त्यांचे व्यक्तिगत मत आहे, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी नांदेड आणि पुण्यात पत्रकारांशी बोलताना केला. 'गोळीची भाषा करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना एकटे पाडले.

राहुल राज एन्काउण्टरनंतर उपमुख्यमंत्री पाटील यांनी गोळीची भाषा केल्याचे निदर्शनास आणले असता भुजबळ म्हणले की हे त्यांचे व्यक्तिगत मत असेल. ही भाषा बरोबर नाही, आमच्या पक्षाची ती भूमिका नाही. त्यावर केंदीय कृषीमंत्री शरद पवार यांचा उल्लेख न करता, उपमुख्यमंत्री पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे, असे पत्रकारांनी विचारल्यानंतर ते म्हणाले : त्यांचा बोलविता धनी कोणीही नाही. त्यांना कोणीही धनी नाही. ते स्वत:चे धनी आहेत! याबाबत सर्वांना बरोबर घेऊन जाणारी पक्षाची भूमिका आहे.

परीक्षेला आलेल्या बिहारी मुलांना मारहाण करणे ही राज ठाकरे यांची चूक होती. आमच्या मुलांबाबत बिहारमध्ये असे घडले असते तर आम्हालाही वाईट वाटले असते. पण मराठी मुलांना रेल्वेत नोकऱ्या मिळत नाहीत, या राज यांच्या तक्रारीची दखल घेऊन खरे काय ते शोधून काढणे हे राज्य सरकारचे काम आहे. रेल्वेत काही त्रुटी असतील तर त्या दुरुस्त केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात मराठी लोकच बिहारी लोकांचे संरक्षण करतील. त्यांचे संरक्षण करण्यास आम्ही समर्थ आहोत, असेही ते म्हणाले.

जागतिक आर्थिक संकट - नवा अध्याय

सप्टेंबर २००८ च्या मध्यास निर्माण झालेल्या अभूतपुर्व आर्थिक पडझडीतून सावरण्यासाठी जॉर्ज बुश यांनी १८ सप्टेंबरला ७०० अब्ज डॉलर्सची तातडीची मदत जाहीर केली. अमेरिकी काँग्रेसने यावर गेले ७-८ दिवस जोरदार चर्चा केली आणि एक आराखडा अमेरिकी जनतेपुढे आणि पर्यायाने जगापुढे ठेवला आहे.

२५० अब्ज डॉलर्सचा पहिला हप्ता सरकार पत-संकटामुळे धोक्यात आलेली कर्जे (होम लोन्स, कर लोन्स, एज्युकेशन लोन्स वगैरे) विविध बँकांकडून विकत घेण्यासाठी वापरेल. ही कर्जे कशी विकत घ्यायची आणि हा कार्यक्रम कसा राबवायचा यासाठी एका ओव्हरसाईट बोर्डची स्थापना करण्यात आली आहे. या बोर्डाचे अध्यक्ष हे अमेरिकेच्या वित्त खात्याचे सचिव असतील.

पत पुरवठा बाजारावर निश्चितच याचा परिणाम होइल. 'बँकाची कर्जे बुडु नयेत, त्यामुळे होणारी आर्थिक कोंडीही टाळावी, कर्जे देण्याचे प्रमाण पुन्हा पुर्ववत होण्यास मदत व्हावी व एकदा बॅंकांचे व्यवहार सुरळीत होउ लागले की अर्थव्यवस्था रुळावरुन घरसण्याचा धोका कमी होण्यास मदत होइल' या उद्देशाने ही मदत दिली जात आहे.

भारतावर या आर्थिक संकटाच्या होणार्‍या परिणामांच्या दिशा-

अमेरिकी अर्थव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला बळकटी येण्याचे कारण हे निर्यातीला मिळालेल्या सपोर्ट मुळे आहे. त्यात ही निर्यात अमेरिकेला सर्वात जास्त होते. या पत-संकटामुळे अमेरिकेत एक वेळ तर अशी आली असती की येथील लोकांचे पगारही वेळेत पूर्ण करणे हेही सामान्य अथवा बड्या उद्योगांना अवघड बनले असते. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार आपण अर्थशास्त्र न समजताही करु शकतो. सामान्य माणसाला जर का महिन्याचा पगारच जर वेळेत मिळाला नाही तर सामाजीक/आर्थिक क्षेत्रात त्याचे भयंकर परिणाम होतील. लोकांची महिन्याची बिले थकतील, विविध उद्योगांची येणी वाढतील, दिवसागणीक तोटा वाढेल आणि हे चक्र लवकरच एका सर्वंकष नाशाला सुरुवात करेल. असो, हे नाशाकडे जाणारे चक्रव्युह भेदण्यासाठी अमेरिकी सरकारने तातडीची उपाययोजना करण्याचे धाडशी पाउल उचलले आहे. परिणाम कसा होईल हे येणारा काळच ठरवेल. अर्थात यामुळे आर्थिक मंदीचे सावट निघून जाईल अशी अपेक्षा करणे हेही चुकीचेच ठरेल.

अशा परिस्थितीत अमेरिकी माणुस स्वतःचे खर्च कमी करण्यास नक्कीच प्राध्यान्य देत आहे. त्याचा परिणाम 'मालाची मागणी कमी होणे-> तयार मालाची इन्व्हेंटरी वाढणे -> आयातदर घसरणे' या सुत्रात होउ शकतो आणि त्याची परिणिती भारताच्या निर्यातीत पडून त्याचा भारतावतर नक्कीच परिणाम होइल. दुसरा परिणाम परकीय गुंतवणूक कमी होणे हा होउ शकतो. त्यानुसार आपल्या येथे शेअरबाजारात त्याचे परिणाम दिसु शकतील. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत जगातल्या सर्व अर्थव्यवस्था या प्रकारच्या मंदीकडे नेणार्‍या चक्रातून प्रवास करतील हा धोका नक्कीच आहे. अर्थात या सर्व सध्या शक्यता आहेत.

भारताच्या आय टी क्षेत्रावर याचा परिणाम येत्या ३-६ महिन्यात दिसण्याची शक्यता आहे. हे परिणाम नकरात्मकच असतील असे मानणे हेही जरा उतावळेपणाचेच ठरेल. भारताचे आय टी क्षेत्र हेही भारतीय निर्यातीतले एक महत्त्वाचे अंग आहे. तरी, अमेरिकी कंपन्यांच्या खर्च कमी करण्याच्या तत्त्वाला बळकटी देणारे आहे. बँकिंग आणि अर्थ सेवा क्षेत्र सोडता इतर ठिकाणी अजुनतरी याचा धोका फारसा दिसत नाही. अर्थात होणार नाही असेही नाही.

मातॄवंदना

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् ।
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ।।१।।

प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो वयम्
त्वदीयाय कार्याय बध्दा कटीयं
शुभामाशिषं देहि तत्पूर्तये ।
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिं
सुशीलं जगद्येन नम्रं भवेत्
श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्ण मार्गं
स्वयं स्वीकृतं नः सुगं कारयेत् ।।२।।

समुत्कर्षनिःश्रेयस्यैकमुग्रं
परं साधनं नाम वीरव्रतम्
तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् ।
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य संरक्षणम् ।
परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं
समर्था भवत्वाशिषा ते भृशम् ।।३।।

।। भारत माता की जय ।।

शिवा पाहीजे!

शिवा पाहीजे!

अंधार होत चाललाय
दिवा पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

नेते झाले अफ़जलखान
काश्मिरचे झाले स्मशान।
शायिस्तेखानची बोटे तोडण्यास
युवा पाहिजे।
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे ॥

मराठे झाले यौवनभक्त
मराठ्यांच्याच तलवारीवर
मराठ्यांचेच रक्त
पुन्हा एकदा रायगडावर
मराठ्यांचा दावा पाहिजे
हर हर महादेव 'हवा' पाहिजे
'हवा' पाहिजे
या देशाला जिजाऊचा
शिवा पाहिजे